Scoregraph Media

एमआयटी-डब्ल्यूपीयू’चा सोशल लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्राम 2024 शाश्वत परिवर्तन आणि नवोन्मेषात अव्वल

स्कोअरग्राफ मिडीया

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने (एमआयटी-डब्ल्यूपीयू) सामाजिक परिवर्तनाकरिता असलेल्या सोशल लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्राम 2024 च्या यशस्वी समारोपाची अभिमानाने घोषणा केली. दिनांक 12 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमाने आजच्या जागतिक आव्हानांसाठी आवश्यक असलेल्या सामाजिक नेतृत्व मूल्यांचे पोषण करण्याच्या उद्देशाने एक अग्रगण्य व्यासपीठ म्हणून काम केले.
कार्यक्रमाचा भव्य समारोप समारंभ झाला. ज्यात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राधाकृष्णन यांनी एसएलडीपी हा विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनशील कार्यक्रम असल्याचे म्हटले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की “निराशा हा जीवनाचा एक भाग आहे, परंतु त्यावर मात कशी करायची हे आपल्याला माहित असले पाहिजे. अपयशाचा स्वीकार करून निराशेचा पराभव करा. ध्येय निश्चित करा आणि हळू हळू त्याच्याकडे सुसंगत वेगाने जा. कधीही हार मानू नका, जे प्रयत्न सोडतात त्यांना यश मिळत नाही. अब्राहम लिंकन हे प्रेरणादायी नेता आहे त्यानी अनेक निवडणूका हरल्यानांतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आणि त्यांनी त्यांच्या देशातील मानवी गुलामगिरी संपवली ज्यामुळे समानता येण्यास सुरुवात झाली. तुम्हा विद्यार्थ्यांकडे अब्राहम लिंकन यांपेक्षा चांगले लॉन्चिंग पॅड आहेत. त्याचा वापर त्यांनी योग्य पद्धतींनी करावा.” लिंकन यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील महत्वाचे लीडर असल्याचे सांगत त्यांनी देशातील गरिबी मिटवण्यासाठी महत्वाची भूमिका घेतल्याचे सांगितले आणि मोदी आज फक्त देशाचेच नाही तर जगातील मोठे नेते असल्याचे सांगितले.

मेजर जनरल विक्रम देव डोगरा, एव्हीएसएम हे या कार्यक्रमाचे सन्माननीय विशेष अतिथी होते. डोगरा यांनी अपयशाचा सामना करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी-डब्ल्यूपीयू’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ डी. कराड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाच्या आधीच्या सत्रात प्रसिद्ध भारतीय माहितीपट निर्माते आणि दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता सिद्धार्थ काक आणि भारतीय अभिनेता, निर्माता आणि दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते गिरीश कुलकर्णी यांच्यासारखे प्रतिष्ठित वक्तेही उपस्थित होते.
एमआयटी-डब्ल्यूपीयू’चे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांनी सोशल इंजिनिअरिंगकडे पाहण्याचा विद्यापीठाचा अनोखा दृष्टीकोन अधोरेखित केला, ते म्हणाले, “समाजात अनेक समस्या आहेत आणि या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शिक्षण प्रणाली एक प्रयोगशाळा म्हणून काम करते. सोशल इंजिनिअरिंगकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांपेक्षा वेगळा आहे. सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रम (एसएलडीपी), रूरल इमर्शन आणि आरआयडीई’सारखे कार्यक्रम विद्यार्थ्यांना एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील शैक्षणिक प्रवास संपेपर्यंत उद्योगासाठी सज्ज करतात.

एमआयटी-डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रो. डॉ. विश्वनाथ डी. कराड, यांनी सोशल लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम 2024 मध्ये आपले आभार आणि अभिमान व्यक्त करताना सांगितले, “आज आपल्या सोबत श्री. सी. पी. राधाकृष्णन आणि मेजर जनरल विक्रम देव डोग्रा यांची उपस्थिती विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. मला विश्वास आहे की येथे उपस्थित तरुण विचारवंत उद्याचे नेते बनतील. ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच जग एक कुटुंब आहे आणि आपल्या देशाची सेवा करणे ही तुमची जबाबदारी आहे. शांततेची संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. शिस्त ही यशाचा पाया आहे. तुमचे मूळ कुठेही असो, यशाच्या प्रवासाला निष्ठा आणि चिकाटीने सामोरे जा.”

सोशल लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्राम 2024 चे उद्‍घाटन गोल्डमॅन एन्वायरमेंटल अवॉर्ड (ग्रीन नोबेल) विजेते
श्री आलोक शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यांनी पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक समानतेवरील स्वत:च्या द्रष्टेपणाने तरुण प्रेक्षकांना प्रेरित केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, “तरुण मनाच्या अशा चैतन्यशील समुहाला संबोधित करण्याची संधी हा माझा सन्मान आहे. छत्तीसगडमधील हसदेव चळवळीत स्थानिकांसह विविध भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. जग अनेकदा विकासाचे मोजमाप सेन्सेक्स, जीडीपी किंवा नफा यासारख्या मापकांद्वारे करत असताना, पर्यावरण संरक्षणाकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. खरा विकास सर्वसमावेशक असला पाहिजे; त्याशिवाय प्रगती अपूर्ण राहते. आर्थिक विषमता वाढतच आहे आणि तरुणच या वास्तवाला आव्हान देऊ शकतात आणि बदलू शकतात. सोशल लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्राम 2024 सारख्या उपक्रमांमुळे तरुणांना या गंभीर समस्या समजून घेण्याची आणि हाताळण्याची संधी मिळते. लक्षात ठेवा, समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तुम्हाला उच्च पदाची गरज नाही-तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करू शकता”.
सोशल लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्राम 2024 मध्ये प्रशासन, सार्वजनिक धोरण, अर्थशास्त्र, सामाजिक नेतृत्व, विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, संशोधन, वाणिज्य, व्यवसाय, व्यवस्थापन, रचना, कला, पत्रकारिता, कायदा आणि शिक्षण यासारख्या आवश्यक क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाने सामाजिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी, आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय उद्दिष्टांमधील संतुलनाचे समर्थन करण्यासाठी बहुशाखीय दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रख्यात वक्त्यांनी ‘व्होकल फॉर लोकल ” (स्वदेशीकरिता आग्रही होणे), “रिइमेजनिंग अर्बन इकोलॉजी” (शहरी परिसंस्थेची पुनर्रचना),”अवेकनिंग द फिनिक्स विदिन” (स्वत:मधील फिनिक्सला जागृतावस्थेत आणणे), “लीडरशिप फॉर एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन” (उद्योजकता आणि नवोन्मेषाकरिता नेतृत्व), “ट्रान्सफॉर्मिंग सोसायटी थ्रू क्रिएटिव्ह एक्सप्रेशन” (सर्जनशील अभिव्यक्तिमार्फत समाजात परिवर्तन), “क्लायमेट रेझिलियंट फूड सिस्टीम्स” (हवामानपूरक अन्न व्यवस्था) आणि “लीडरशिप फॉर एन्व्हायर्नमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट” (पर्यावरण तसेच शाश्वत विकासाकरिता नेतृत्व) यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला.
सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रम हा केवळ एक शैक्षणिक उपक्रम नसून #WeTheChangeMakers या मंत्राने प्रेरित एक चळवळ आहे. गंभीर सामाजिक आव्हानांचा सामना करणे आणि चांगल्या भविष्याच्या शोधात कोणीही मागे राहणार नाही याची खात्री करून घेणे, विद्यार्थ्यांना परिवर्तनाचे प्रतिनिधी बनविण्यासाठी प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे.
या समारंभाला कुलगुरू प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस, मुख्य शैक्षणिक अधिकारी, डॉ. संजय कामटेकर आणि सहयोगी अधिष्ठाता आणि सोशल लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्राम (एसएलडीपी) 2024 चे संयोजक डॉ. गणेश काकंडीकर या विद्यापीठातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]