Scoregraph Media

वरकुटे खुर्द येथील स्वप्निल दगडे याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत केली रौप्य पदकाची कमाई

स्कोअरग्राफ मिडीया

वरकुटे खुर्द येथील स्वप्निल शहाजी दगडे या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत भरघोस यश संपादन केले. राज्य स्तरावरील स्पर्धेत यश संपादन करुन गावाचा नावलौकिक वाढविल्याबद्दल वरकुटे खुर्द ग्रामस्थांकडून स्वप्निलचे कौतुक करण्यात येत आहे. वरकुटे खुर्दचे उपसरपंच शहाजी दगडे यांचा तो चिरंजीव आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कुस्तीमध्ये स्वप्निलने हे यश संपादन केले आहे.

स्वप्निल सध्या वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब या ठिकाणी इयत्ता बारावी मध्ये शिकत आहे. त्याला त्याचे क्रीडाशिक्षक अमित काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज