Scoregraph Media

मंत्रीमंडळ विस्तारात 33 कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री, पुणे आणि सातारा जिल्ह्यातून प्रत्येकी चार मंत्री

स्कोअरग्राफ मिडीया

नागपूर येथे राजभवनावरती महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा नुकताच संपन्न झाला. यामध्ये 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 39 पैकी 33 कॅबिनेट आणि 06 जणांची राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात चार महिलांनाही संधी देण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, आदिती तटकरे, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. कॅबिनेट पदी वर्णी लागलेले मंत्री पुढील प्रमाणे
1.चंद्रशेखर बावनकुळे
2.राधाकृष्ण विखे पाटील
3.हसन मुश्रीफ
4.चंद्रकांत पाटील
5.गिरीश महाजन
6.गुलाबराव पाटील
7.गणेश नाईक
8.दादाजी भुसे
9.संजय राठोड
10.धनंजय मुंडे
11.मंगलप्रभात लोढा
12.उदय सामंत
13.जयकुमार रावल
14.पंकजा मुंडे
15.अतुल सावे
16.अशोक उईके
17.शंभूराज देसाई
18.आशिष शेलार
19. दत्तात्रय भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रराजे भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25 . संजय सावकारे
26.संजय शिरसाट
27. प्रताप सरनाईक
28. भरतशेठ गोगावले
29. मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबीटकर

राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेले मंत्री पुढील प्रमाणे

34. माधुरी मिसाळ
35. आशिष जैयस्वाल
36. पंकज भोयर
37. मेघना बोर्डीकर
38. इंद्रनील नाईक
39. योगेश कदम

या मंत्रिमंडळ विस्तारात बीडमधून पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे बहीण भाऊ एकाच वेळी मंत्री झाले आहेत. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातून प्रत्येकी चार जण मंत्री झाले आहेत.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज