Scoregraph Media

भुजबळांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही – भाजप नेते गिरीश महाजन

स्कोअरग्राफ मिडीया

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलल्याने ओबीसी समाज व भुजबळ नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आपण राज्याचा दौरा करणार असून ओबीसींचा एल्गार करणार असल्याची घोषणा करून भुजबळ यांनी महायुतीला एक प्रकारे इशारा दिला आहे. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून बाहेर पडतील अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या संकटमोचक गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे. भुजबळांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही हे खरं आहे असे गिरीश महाजन म्हणाले आहेत .
महाजन म्हणाले, भुजबळ साहेब हे ओबीसींचे मोठे नेते आहेत. ओबीसींचा मोठा चेहरा म्हणजे भुजबळ साहेब… याबाबत कोणाचे दुमत नाही. त्यांची नाराजी आम्हाला परवडणार नाही हे खरं आहे. मी नाशिकला जाणार आहे, तेव्हा मी त्यांची भेट घेणार आहे. आम्ही प्रयत्न करू ते आम्हाला सोडून जाणार नाहीत. तसेच मला खात्री आहे ते आम्हाला सोडून जाणार नाहीत असेही गिरीश महाजन म्हणाले.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज