स्कोअरग्राफ मिडीया
कृषी जागरण मिडीया हाऊस, नवी दिल्ली यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय मिलेनियम फार्मर्स ऑफ इंडिया या पुरस्काराने कृषीभूषण शेतकरी श्री प्रल्हाद गुलाबराव वरे यांना सन्मानित करण्यात आले. IARI Mela Ground Pusa, New Delhi येथे नुकत्याच झालेल्या समारंभात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार देशातील ५० प्रगतशील शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण भगीरथ चौधरी (राज्यमंत्री, कृषी व शेतकरी कल्याण भारत सरकार), कैलास चौधरी (मा. राज्यमंत्री, कृषी व शेतकरी कल्याण भारत सरकार), अजयकुमार मिश्रा (मा. गृहराज्यमंत्री, भारत सरकार) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ हिमांशु पाठक (डायरेक्टर जनरल, इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च), शिनी डॉमिनिक (एम डी, कृषी जागरण नवी दिल्ली) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रल्हाद वरे यांना काही अडचणी मुळे पुरस्कार कार्यक्रमास जाता आले नाही, परंतु त्यांचा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्री बी जीमहाजन सर यांनी स्विकारला.

Author: Scoregraph Media



