Scoregraph Media

आपल्या आनंदाचा बूस्टर डोस शोधण्याचा प्रयत्न आपण केला आहे का ?

इंदापूर – तुषार शेंडे
आपल्या भोवतीचे जग हे आनंदाच्या बूस्टरने म्हणजेच हॅपिनेस बूस्टरने भरलेले असते. पण अनेकदा आपण ते शोधलेले नसतात. रोजच्या जगण्यातील हे छोटे छोटे क्षण म्हणजेच आनंदाचे बूस्टर जर आपण स्पॉट केले आणि नियमितरीत्या त्या गोष्टी रिपीट केल्या तर आपले आयुष्य आनंदाने भरून जायला वेळ लागणार नाही. आपण काही बूस्टर ची यादी करण्याचा प्रयत्न करूयात.
1) कोणते गाणे ऐकल्यानंतर आपणास अधिक पावरफुल वाटते, छान वाटते, जीवनातील दुःख विसरून आनंदी होऊन जातो आपण?
2) कोणते अन्न आपणास एनर्जेटिक आणि समाधानाची फिलिंग देते?
3) कोणती कृती केल्याने आपणास शांत, रिलॅक्स आणि समाधानी वाटते?
4) अशी एखादी गोष्ट, पुस्तक, पॅराग्राफ, एखादा यशाचा मंत्र, ज्यामुळे तुम्ही मोटिवेट होतात? तुम्हाला ऊर्जा मिळते.
5) कोणाला भेटल्यास, चर्चा केल्यास आपणास ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास मिळतो अशा माणसांची यादी.
6) असे एखाद्या ठिकाण जिथे तुम्हाला फार कंफर्टेबल वाटते?


7) एखादी बेस्ट व्यक्ती जिला कॉल केल्यास, मेसेज केल्यास, भेटल्यास त्या व्यक्तीमुळे मी आयुष्यात पुढे जात आहे अशी भावना निर्माण होते?
8) एखादा असा फोटो, व्हिडिओ, प्रसंग जो तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आणतो?
9)एखादी छोटी गोष्ट जी तुम्ही इतरांच्या भल्यासाठी करू शकता? असे अनेक आनंदाचे बूस्टर आपल्याला शोधता येतील. ते अधिकाधिक शोधावेत.त्याची यादी करण्याचा प्रयत्न कधीतरी करावा. जे मनापासून आनंद देते, प्रेरणा देते, प्रोत्साहन देते, समाधान देते ते शोधल्यास व पुन्हा पुन्हा रिपीट केल्यास नको असलेल्या कचऱ्यास आपल्या आयुष्यात प्रवेशच मिळणार नाही आणि हळूहळू जगण्याचा प्रवास आनंदमयी यशाकडे होईल हे मात्र नक्की. कराल ना मग आपण आपापल्या आयुष्याती हे बूस्टर शोधण्याचा प्रयत्न? स्वतःसाठीचा एक छोटासा गृहपाठ… टीम स्कोअरग्राफ आपल्या सोबत आहे. लाईक आणि कमेंट नक्की करा…

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]