Scoregraph Media

निमगाव केतकी येथील ॲड सचिन राऊत व वैभव जाधव यांचा वनविभागाच्या वतीने सन्मान

स्कोअरग्राफ मिडीया

निमगाव केतकी येथील ॲड सचिन राऊत व वैभव जाधव यांना महाराष्ट्र शासनाच्या पुणे वन विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वन्यजीव बचाव व संरक्षण कार्यात वनविभागास सहाय्य केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
निसर्गाची सेवा हिच ईश्वर सेवा असे समजून गेली 15 ते 20 वर्षे सातत्यपूर्ण ही जोडी पशुपक्षांची व प्राण्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. वेळेचा, व्यवसायाचा, नफ्या तोट्याचा विचार न करता ही सेवा चालू आहे.


खऱ्या अर्थाने या सन्मानाचे श्रेय फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबमधील सर्व सहकारी व वेळोवेळी या कार्यासाठी सदृश्य अदृश्य मदत करणारे सर्व पर्यावरण मित्र यांचे आहे. तसेच पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांच्या सहकार्यामुळे आणखी या कामांमध्ये गती मिळाल्याची प्रतिक्रिया ॲड सचिन राऊत व वैभव जाधव यांनी दिली.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]