स्कोअरग्राफ मिडीया
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार होते. काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे.
नाना पटोले म्हणाले, कोणी कोणी क्रॉस वोटिंग केले याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे आहे. आम्ही या निवडणुकीत काही संशयित काँग्रेस आमदारांच्या पाठीमागे ट्रॅप लावलेला होता. जे कुणी बदमाश आहेत ते आमच्या ट्रॅपमध्ये आले असून अशा विश्वासघातकी व गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढले जाईल, असे विधान नाना पटोले यांनी केले आहे.
मागील विधान परिषदेत निवडणुकीतही या लोकांनी गद्दारी केल्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आम्ही या लोकांच्या मागे ट्रॅप लावला होता. आता जे कोणी बदमाश आहेत ते आमच्या ट्रॅप मध्ये आले आहेत. त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा कोणी असं कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Author: Scoregraph Media



