Scoregraph Media

वरकुटे खुर्द येथील विनोद शेंडे लोकमतच्या वतीने पद्मश्री पां. वा. गाडगीळ पुरस्काराने सन्मानित

स्कोअरग्राफ मिडीया

आर्थिक – विकासात्मक लेखनासाठी लोकमतच्या वतीने वरकुटे खुर्द येथील विनोद शेंडे यांना पत्रपंडित पद्मश्री पां. वा. गाडगीळ स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले.

भूक निर्देशांक: घसरणीचा विकास या लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखनसाठी हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण नागपूर येथे द न्यू इंडियन एक्सप्रेसचे संपादकीय संचालक व इंडिया टुडेचे माजी संपादक पद्मविभूषण प्रभू चावला, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री नितीन राऊत, लोकमत मिडिया ग्रुपचे संचालक व माजी खासदार मा. डॉ. विजय दर्डा व लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

विनोद सध्या साथी संस्था पुणे येथे प्रकल्प संचालक म्हणून काम करत आहे. त्याने कुपोषण विषयासंदर्भात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण समाजकार्य (Batchelor and Master in Social Work)या विषयात घेतले आहे.
पदवी साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयातून, तर पदव्युत्तर शिक्षण कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस, पुणे येथून पूर्ण केले आहे.

पुण्यातील साथी संस्थेसोबत 2011 पासून आरोग्य हककासाठी काम करत आहेत.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, कुपोषण कमी करण्यासाठीच्या विविध उपाययोजना करणे व खाजगी आरोग्य व्यवस्थेचे नियमन यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यात काम करत आहे. तसेच याच बाबत राज्य शासनासोबतही काम करत आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्याच्या प्रकल्पात विशेष सहभाग राहिला आहे. तसेच कोविड काळात हॉस्पिटल्स कडून होणाऱ्या अतिरिक्त बिलांच्या नियंत्रणासाठीही काम केले आहे.

यासोबतच सद्यस्थितीत मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून कुपोषण कमी करण्याच्या मॉडेलवर phd करत आहे.
जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र या आरोग्य संबंधी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.

विविध वृत्तपत्रंसाठी विविध सामाजिक मुद्यांवर नियमित लिखाण करत आहे. अनेकदा या लिखाणाची दखल सरकार दरबारी घेतली गेली आहे व त्यानुसार धोरणात्मक बदलही करण्यात आले आहेत. ज्या वरकुटे खुर्द गावात आजही वर्तमानपत्र येत नाही अशा खेडेगावातून येऊन विनोदला वर्तमान पत्रातील लेखनासाठी हा पुरस्कार भेटणं हे खरंच कौतुकास्पद आहे.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]