Scoregraph Media

आधार सेवा परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

स्कोअरग्राफ मिडीया

इंदापूर मधील आधार सेवा परिवाराच्या वतीने श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर मधील 43 गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केल्याची माहिती आधार सेवा परिवाराचे अध्यक्ष अरुण राऊत सर यांनी दिली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय सोरटे होते. याप्रसंगी शालेय साहित्याचे वाटप मुख्याध्यापक संजय सोरटे , पर्यवेक्षिका श्रीमती शारदा जगताप, आधार चे अध्यक्ष अरुण राऊत, हायस्कूल मधील सर्व शिक्षक शिक्षिका या सर्वांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच इंदापूर मधील मूकबधिर निवासी शाळा मधील 65 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊ चे वाटप करण्यात आले. सन 2010 पासून आधार सेवा परिवाराच्या वतीने दरवर्षी इंदापूर तालुक्यातील काही शाळांची निवड करून त्यामधील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते. आतापर्यंत परिवाराच्या वतीने 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अध्यक्ष अरुण राऊत सर बालाजी अडसुळे, श्रीमती स्वाती देडे, रोहिणी नलवडे, मंगेश जाधव , एल आय सी विकास अधिकारी प्रतिक शिंदे, नानासाहेब हेगडे, विपुल वाघमोडे , डॉक्टर अभिजीत ठोंबरे या सर्वांनी मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  दीपक झगडे यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक संजय सोरटे व अरुण राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. रामदास देवकर यांनी आभार मानले .

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]