Scoregraph Media

भरणे मामा म्हणाले – पिण्याला कोणाचा विरोध नाही, देवेंद्र फडणवीस म्हणाले – त्यांना पाणी म्हणायचं होतं.

स्कोअरग्राफ मिडीया
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात इंदापूरचा पाणी प्रश्नाबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि यासंदर्भात मंत्र्यांसोबत त्या त्या तालुक्यातील आमदारांची बैठक लावण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, खडकवासला धरणातील आमचे 3.9 टीएमसी पाणी पुणे शहर वाढल्यामुळे आम्हाला मिळत नाही. त्यामुळे पुणे शहराच्या खालच्या बाजूला असलेल्या तालुक्यांना देखील पाणी मिळाले पाहिजे. सणसरकट मधून इंदापूर तालुक्यातील दुष्काळी गावांना मागील दहा वर्षाहून अधिक काळ पाणी मिळाले नाही. यासंदर्भात टाटाच्या धरणातील पाणी देण्यासंदर्भात सुर्वे समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल काय आला असून शासन यासंदर्भात कधीपर्यंत कार्यवाही करणार असा प्रश्न भरणे यांनी उपस्थित केला तसेच पश्चिम घाटातील समुद्रात वाहून जाणारे पाणी खडकवासला, वरसगाव, पानशेत या धरणांमध्ये वळवण्यासंदर्भातही शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना पुणे शहर वाढल्यामुळे इंदापूरचे हक्काचे 3.9 टीएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी दिले जाते हे सांगत असताना दत्तात्रय भरणे म्हणाले, पिण्याला कोणाचा विरोध नाही. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिश्किलपणे म्हणाले, भरणे मामा म्हणाले – पिण्याला कोणाचा आक्षेप नाही, पण त्यांना पाणी म्हणायचं होतं आणि सभागृहात सगळेच हसायला लागले. आमदार दत्तात्रय भरणे हे बोली भाषेत बोलण्यासाठी प्रसिद्ध असून आपण साधा माणूस असून ग्रामीण भाषेत बोलतो असे ते सांगत असतात. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही असेच ग्रामीण बोलीतील शिव्यांमुळे ते व्हायरल झाले होते. आज पुन्हा एकदा त्यांच्या ग्रामीण बोलीमुळे विधिमंडळातील वातावरण काही वेळ का होईना हलकं फुलकं झालं आणि त्यांच्या भाषणातील उच्चार करायचा राहिलेला पाणी हा शब्द उचलत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मामांची फिरकी घेतली व इंदापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासंदर्भात लवकरच बैठक लावण्याचे आश्वासनही दिले.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा…

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]