Scoregraph Media

भाजपकडून विधानपरिषदेसाठी पाच नावे जाहीर, हर्षवर्धन पाटील यांना संधी नाही – इंदापूर विधानसभा तिरंगी होणार?

स्कोअरग्राफ मिडीया

विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होत असून भारतीय जनता पक्षाकडून आज पाच उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभेला बीड मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून एकूण पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, डॉक्टर परिणय फुके व अमित गोरखे या नावांचा यामध्ये समावेश आहे.

मनिषा कायंदे, विजय गिरकर, बाबाजानी दुराणी, नीलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजाहत मिर्जा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत पाटील (शेकाप) या विधानसभेतून विधान परिषदेवर गेलेल्या अकरा सदस्यांची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. या रिक्त जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होत असून 02 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून इंदापूरचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव विधान परिषदेसाठी चर्चेत होते. इंदापूर विधानसभेचा तिढा सोडवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषद आणि दत्तात्रय भरणे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. परंतु प्रत्यक्षात जाहीर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे नाव नसल्याने इंदापूर विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार व एकाला उमेदवारी मिळाल्यास दुसरा गप्प बसणार का? हा प्रश्न आता चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानसभा ताकतीने लढवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसे झाल्यास इंदापूर विधानसभा तिरंगी होणार की महायुतीकडून उमेदवारी न मिळालेला नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडून लढणार अशी ही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

 

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]