Scoregraph Media

राऊतवाडी जि.प. शाळेतील शिक्षकांची बदली करा, अन्यथा शाळा बंद करून उपोषण करण्याचा राऊतवाडी ग्रामस्थांचा इशारा

स्कोअरग्राफ मिडिया

राऊतवाडी (निमगाव केतकी) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदली करण्यात यावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी इंदापूर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.

राऊतवाडी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे दुर्लक्ष करत असून अनेकदा सूचना करूनही त्यामध्ये बदल होत नाही. त्यामुळे या शाळेतील रणजीत कोळी व नीलम ठवरे या शिक्षकांची बदली करण्यात यावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर भोंग, युवा नेते संजय राऊत व अनेक पालकांनी अर्जाद्वारे केली आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा ठरावही करण्यात आला आहे.

शाळेची गुणवत्ता ढासळल्यामुळे पटसंख्या कमी होत असून लवकरात लवकर शिक्षकांची बदली करून नवीन शिक्षक न दिल्यास शाळा बंद ठेवून उपोषण केले जाईल असा इशाराही अर्जामध्ये देण्यात आला आहे.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]