स्कोअरग्राफ मिडीया
एलआयसी ने नवीन हाती घेतलेल्या जीवन समर्थ प्रोजेक्ट मध्ये बारामती येथील विमा प्रतिनिधी संजय घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातून ठराविक एजंट, ठराविक विकास अधिकारी, तसेच शाखा व्यवस्थापक यांची निवड करून त्यांच्याकडून भविष्यात LIC मध्ये हवे असणारे बदल याविषयी मते जाणून घेणार आहेत. या प्रोजेक्ट वरती देशपातळीवर मुख्य 8 ते 10 अधिकारी काम करीत असून एकूण 15 महिन्यांसाठी हा प्रकल्प चालणार आहे.त्या धर्तीवर नुकतीच मुंबईमधील मंत्रालया शेजारी असलेल्या LIC च्या ‘योगक्षेम’ या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या प्रकल्पासाठी बारामती शाखेतून 1000 एजंट मधून संजय घोरपडे यांची निवड करण्यात आल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Author: Scoregraph Media
Post Views: 129



