Scoregraph Media

I am Nilesh Dnyandev Lanke निलेश लंकेंनी संसदेत इंग्रजीत खासदारकीची शपथ घेतली, सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर

स्कोअरग्राफ मिडीया
आज संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीत घेतलेली शपथ चर्चेचा विषय ठरली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुजय विखे यांनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलता येत नसल्यावर टीका केली होती. प्रचारादरम्यान सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये इंग्रजी भाषेवरून चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर बोलताना आपण दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण करणार असल्याचे निलेश लंके यांनी सांगितले होते. निलेश लंके यांनी आपला शब्द खरा करत आज संसदेत इंग्रजीत खासदारकीची शपथ घेतली व सुजय विखे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर शेवटी निलेश लंके जय हिंद, जय महाराष्ट्र…राम कृष्ण हरी असे म्हणाले. त्यांची शपथ ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा…

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]