Scoregraph Media

नीट (NEET) पेपर फुटीचे लातूर कनेक्शन, झेड पीच्या दोन शिक्षकांचा सहभाग – एकाला अटक दुसरा फरार

स्कोअरग्राफ मिडीया
नीट परीक्षेदरम्यान मोठा गैरप्रकार झाला असून नीटचा (NEET EXAM) पेपर फुटल्याचे उघड होत आहे. याचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला असून विविध राज्यात कसून चौकशी चालू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातील लातूर कनेक्शन समोर आले असून यामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांचा सहभाग असल्याचे उघड झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

देशभरात गाजत असलेल्या या प्रकरणात लातूर मधून दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली असून दुसरा शिक्षक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही तो फरार कसा झाला हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत चार नावे समोर आली असून हे शिक्षक घोटाळा करून ते पैसे धाराशिव मार्गे दिल्लीला पाठवत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी जलील पठाण याला अटक केली असून काल ताब्यात घेतलेला संजय जाधव मात्र आज फरार झाला आहे.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]