स्कोअरग्राफ मिडीया
बारामतीच्या लोकसभेची लढत यंदा पवार विरुद्ध पवार अशी झाली आणि ही निवडणूक देशातच नव्हे तर जगभरात चर्चेचा विषय ठरली. कारण सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर चक्क न्यूयॉर्क शहरात अभिनंदनाचा बॅनर लागला होता. आता तर थेट रशियावरून पीटर नावाचा एक मुलगा बारामतीच्या निवडणूकीची चर्चा ऐकून माहिती घेण्यासाठी बारामतीला आला आहे. याची माहिती खुद्द शरद पवार यांनीच दिली आहे.
आज बारामतीतील सांगवी येथे शरद पवारांची सभा झाली. या सभेस पीटर उपस्थित होता. शरद पवार म्हणाले, निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष होतं. आज माझ्याबरोबर एक रशियावरून मुलगा आलाय त्याचं नाव पीटर. मी त्यांना विचारलं कशासाठी येताय? ते म्हटले गावामध्ये तुमच्या निवडणुका झाल्या त्याची काय पद्धत असते? रशियात सुद्धा चर्चा झाली बारामतीच्या निवडणुकीची आणि म्हणून तो स्वतः इथे आला आहे रशियावरून. काही हरकत नाही जी चर्चा सगळीकडे झाली, तो एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला. त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो असे शरद पवार म्हणाले.

Author: Scoregraph Media



