Scoregraph Media

घरीच अभ्यास करून इंदापूर येथील हर्षदा राऊतने नीट परीक्षेमध्ये मिळवले उज्वल यश

स्कोअरग्राफ मिडीया

इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मधील सहशिक्षक श्री अरुण लक्ष्मण राऊत यांची कन्या हर्षदा अरुण राऊत हिने नीट युजी ( NEET – UG) या वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या परीक्षेत 720 पैकी 660 गुण प्राप्त करून दैदीप्यमान यश मिळवले आहे. हर्षदा हिने कोणतीही शिकवणी न लावता केवळ घरच्या  घरी अभ्यास करत  नीट परीक्षेत कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण श्री ना. रा. इंग्लिश मीडियम स्कूल इंदापुर येथे झाले आहे व नंतरचे बारावी पर्यंतचे शिक्षण श्री ना. रा. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इंदापूर मध्ये झाले आहे. तिला दहावी मध्ये 94.60 टक्के गुण व बारावी मध्ये 91.87% गुण मिळाले होते व दोन्ही वेळेस प्रथम क्रमांक मिळाला होता. गेल्या वर्षी तिला नीट परीक्षेमध्ये 560 गुण मिळाले होते. परंतु तिचा शासकीय कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी नंबर न लागल्यामुळे खचून न जाता तिने जोमाने घरीच अभ्यास केला व हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल परिसरात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. या उज्वल यशाबद्दल माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले , सचिव मनोहर चौधरी व संस्थेच्या वतीने  तिचे अभिनंदन करण्यात आले. तसेच इंदापूर मधील अनेक सामाजिक संस्था व पदाधिकाऱ्यांकडून तिचा सत्कार करण्यात आला.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]