Scoregraph Media

2019 ला ज्याला संपला म्हणून हिणवले, त्याच्या पक्षाने 2024 च्या निवडणुकीत शंभर टक्के जागा जिंकून इतिहास रचला

स्कोअरग्राफ मिडीया

नुकताच देशातील लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रातील निकाल पाहता एकच चर्चा रंगली ती म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाच्या स्ट्राईक रेटची. कारण महाराष्ट्रात दहा पैकी आठ जागा म्हणजेच 80 टक्के स्ट्राईक रेट एवढा इतर कुठल्याच पक्षाचा नव्हता. पण एखाद्या पक्षाने लढवलेल्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या असं आपण क्वचितच ऐकलं असेल. या 2024 च्या लोकसभेतही एक असा पक्ष आहे ज्याचा स्ट्राईक रेट 100% असून त्याने विधानसभेच्या 21 जागा लढवल्या व संपूर्ण 21 च्या 21 जिंकल्या आणि लोकसभेच्या 02 जागा लढवल्या व त्या दोन्हीही जिंकल्या. शंभर टक्के स्ट्राईक रेट असलेला या पक्षाचे नाव आहे जनसेना पार्टी आणि पक्षाचा प्रमुख आहे पवन कल्याण.
पवन कल्याण हा आंध्र प्रदेशातील फिल्मस्टार चिरंजीवी चा भाऊ. चिरंजीवी ने आपला पक्ष प्रजाराज्य हा काँग्रेस पक्षामध्ये विलीन केल्यानंतर हा निर्णय पवन कल्याणला आवडला नाही. त्याने जनसेना पार्टी हा स्वतःचा नवीन पक्ष काढला व काम सुरू केले. 2019 च्या निवडणुकीत त्याच्या पक्षाने 137 जागा लढवल्या व फक्त एक जागा जिंकला. स्वतः पवन कल्याणही दोन ठिकाणी उभा राहूनही पराभूत झाला.

पवन कल्याण संपला. त्याचा पक्ष संपला अशी चर्चा सर्वत्र सुरू असतानाच त्याने पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू केले. 2023 मध्ये जेव्हा जगन मोहन रेड्डी सरकारने चंद्राबाबू नायडू यांना अटक केली, तेव्हा पवन कल्याणने चंद्राबाबू नायडू यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. चंद्राबाबू नायडू यांना अटक झाल्यानंतर पवन कल्याण गाड्यांचा ताफा घेऊन त्यांना जेलमध्ये भेटायला गेला व आपण चंद्रबाबू नायडू यांच्या सोबत आहोत अशी घोषणा त्यांने केली आणि तिथून पुढे त्याच्या नावाचा बोलबाला सुरू झाला. 2024 च्या निवडणुकीपूर्वी त्याने संपूर्ण आंध्र प्रदेशात गाडीच्या टपावर बसून प्रचार केला,यात्रा काढली, भाषणे केली आणि चंद्रबाबू नायडू व भाजप सोबत युती करत विधानसभेच्या 21 व लोकसभेच्या दोन जागा लढवल्या आणि आश्चर्य म्हणजे विधानसभेच्या 21 जागा आणि लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकून दाखवल्या. 100% स्ट्राईक रेट असलेला हा देशातला एकमेव पक्ष आहे आणि म्हणूनच लोकसभा निकालानंतर नरेंद्र मोदींनीही भाषणात पवन कल्याणचा उल्लेख एक आंधी म्हणून केला. नुकत्याच आंध्र प्रदेशात राज्य सरकारच्या झालेल्या शपथविधीत पवन कल्याणने आंध्र प्रदेशचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2019 ला ज्याचा संपला म्हणून सर्वजण उल्लेख करत होते, तोच 2024 ला शंभर टक्के स्ट्राइक रेटने आंध्रप्रदेशचा उपमुख्यमंत्री झाला. या यशाबद्दल पवन कल्याणचे खूप खूप अभिनंदन.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]