Scoregraph Media

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 201 वैद्यकीय पदांची भरती, तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे

स्कोअरग्राफ मिडीया

पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आरोग्य क्षेत्रात विविध पदांसाठी तब्बल 201 जागांची भरती निघाली असून या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय सेवक अशी विविध पदे भरली जाणार आहेत. आज 12 जून पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवार 21 जून पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
वैद्यकीय अधिकारी पदासाठी 67 जागांवरती स्टाफ नर्स साठी 67 जागा आणि बहुउद्देशीय सेवक पदासाठी 67 जागा अशी एकूण 201 जागांवरती भरती होणार आहे.
वैद्यकीय अधिकारी पदासाठी एमबीबीएस किंवा बी ए एम एस उत्तीर्ण असणे आवश्यक असून इंडियन मेडिकल कौन्सिल किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांच्याकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. एमबीबीएस व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
स्टाफ नर्स पदासाठी बारावीनंतर जी एन एम किंवा बीएस्सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदाचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.
तसेच बहुउद्देशीय सेवक पदासाठी बारावी सायन्स उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यासोबत पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस यांना 60 हजार रुपये प्रति महिना एवढा पगार असून बीएएमएस असल्यास 25 हजार रुपये मानधन अधिक पंधरा हजार रुपये कामावर आधारित मोबदला दिला जाणार आहे. स्टाफनर्स पदासाठी 20 हजार रुपये प्रति महिना व बहुउद्देशीय सेवक पदासाठी 18 हजार रुपये प्रति महिना पगार असणार आहे.
इच्छुक उमेदवार पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, आवक जावक कक्ष, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिनकोड – 411018 या पत्त्यावर अर्ज करू शकतात किंवा भेट देऊन अधिक माहिती घेऊन अर्ज करू शकतात.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]