स्कोअरग्राफ मीडिया
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून राज्यसभेसाठी पार्थ पवार इच्छुक असून त्यासंदर्भात त्यांनी प्रफुल्ल पटेल व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यसभेची एक जागा अजित पवार सातारा जिल्ह्याला देणार असे त्यांनी या आधीच स्पष्ट केले आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी सोडलेल्या जागेसाठी पार्थ पवार इच्छुक असल्याचे समजत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यासंदर्भात मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. राज्यसभेच्या या रिक्त जागेसाठी 25 जून रोजी पोटनिवडणूक होत असून या जागेसाठी आनंद परांजपे, छगन भुजबळ व बाबा सिद्दिकी हेही लॉबिंग करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Author: Scoregraph Media
Post Views: 399



