Scoregraph Media

लोकसभेला पराभूत झालेल्या दोघांनाही मिळाली मंत्रिपदाची संधी, महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रीपदे

स्कोअरग्राफ मिडीया

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली व आपल्या तिसऱ्या टर्म ला सुरुवात केली. यावेळी एनडीएचे घटक पक्ष मिळून एकूण 71 जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. नुकताच राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.
मोदींच्या या मंत्रिमंडळात दोन चेहरे असेही आहेत की जे लोकसभेला पराभूत झालेले आहेत. महाराष्ट्रातील बडे नेते नारायण राणे, माजी मंत्री भागवत कराड यांचा देखील या मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. परंतु लोकसभेला पराभूत झालेल्या तामिळनाडू आणि पंजाब मधील दोन नेत्यांचा मात्र मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. तामिळनाडूमधील एल मुरुगन व पंजाब मधील रवणीत सिंह बिट्टू यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. रवणीत सिंह बिट्टू हे पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत.

महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रीपदे

मोदींच्या या मंत्रिमंडळात महाराष्ट्रालाही सहा मंत्री पदे मिळाली असून दोन कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री पदांचा यामध्ये समावेश आहे. पियुष गोयल, नितीन गडकरी यांना कॅबिनेट तर रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव व रामदास आठवले यांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज