Scoregraph Media

सुजय विखेंचा धक्कादायक पराभव, निलेश लंके विजयी

स्कोअरग्राफ मिडीया

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक धक्कादायक निकाल लागला असून अहमदनगर येथील भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाला असून निलेश लंके हे 28929 मतांनी विजय झाले आहेत. विखे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील फार मोठे प्रस्थ असून सुजय विखेंचा पराभव झाल्याने भाजपला या ठिकाणी मोठा धक्का बसला आहे. अहमदनगर मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदीं सहित अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. तसेच सुजय विखे पाटील हे तेथील विद्यमान खासदारही होते. परंतु निलेश लंके यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत भाजपाला व विखे पाटलांना मोठा धक्का दिला आहे. निलेश लंके यांना 6,24797 तर सुजय विखे यांना 5,95,868 एवढी मते मिळाली.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]