Scoregraph Media

एका एक्झिट पोलचा अंदाज, मोदी सरकार जाणार

स्कोअरग्राफ मिडीया

एक जून रोजी मतदानाचा सातवा टप्पा संपल्यानंतर सर्वच एक्झिट पोल एजन्सीज ने आपापले एक्झिट पोल जाहीर केले व एकूण नऊ एक्झिट पोल पैकी आठ एक्झिट पोल एजन्सीज ने एनडीए ला बहुमत मिळत असल्याचा पोल जाहीर केला. यामध्ये काही एजन्सीज ने एनडीए ला 400 पार ही जागा दाखवल्या. पण यामध्ये एक एक्झिट पोल एजन्सी अशी आहे, तिने इंडिया आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे उद्या 4 जून रोजी जनतेचा कौल कोणाला राहणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे.
एबीपी न्यूज सी वोटर यांनी एनडीएला 353 ते 383 एवढ्या जागा मिळतील तर इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळतील व इतरांना चार ते बारा जागा मिळतील असा पोल दिला आहे.

जन की बात या एक्झिट पोलने एनडीए ला 362 ते 392 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला असून इंडिया आघाडीला 141 ते 161 जागा व 10 ते 20 जागा इतरांना मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

रिपब्लिक भारत मॅट्रिज या एक्झिट पोल ने इंडियाला 353 ते 368 जागा मिळतील व इंडिया आघाडीला 118 ते 133 जागा मिळतील आणि इतरांना 43 ते 48 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

रिपब्लिक टीव्ही पी मार्क या एक्झिट पोल ने एनडीए ला 359 जागा मिळतील तर इंडिया आघाडीला 154 व इतरांना 30 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

इंडिया न्यूज डी डायनामिक्स या एक्झिट पोल ने एनडीएला 371 तर इंडिया आघाडीला 125 व इतरांना 47 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

न्यूज नेशनने आपल्या पोलमध्ये एनडीएला 342 ते 378 व इंडिया आघाडीला 153 ते 169 एवढ्या जागा दाखवल्या असून 21 ते 23 जागा या इतरांना दाखवल्या आहेत.

इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया यांनी आपल्या एक्झिट पोल मध्ये एनडीए ला 361 ते 401 एवढ्या जागा दाखवल्या असून इंडिया आघाडीला 131 ते 166 व इतरांना 8 ते 20 जागा दाखवल्या आहेत.
दैनिक भास्कर ने आपल्या पोलमध्ये एनडीएला 281 ते 350 जागा दाखवल्या असून इंडिया आघाडीला 145 ते 201 व इतरांना 33 ते 49 जागा दाखवल्या आहेत.
आणि आता शेवटचा पोल आहे डीबी लाईव्ह. वरील आठ पोलच्या वेगळा एक्झिट पोल डी बी लाईव्ह ने दिला असून इंडिया आघाडीला 255 ते 290 जागा मिळतील व एनडीए ला 207 ते 241 जागा मिळतील आणि इतरांना 29 ते 51 जागा मिळतील असा एक्झिट पोल दिला आहे. या एकूण नऊ पोल पैकी केवळ डीबी लाईव्ह या एकाच एक्झिट पोल एजन्सीने इंडिया आघाडीला बहुमत दाखवले आहे. त्यामुळे उद्या नक्की काय होणार? कोणाचा एक्झिट पोल खरा होणार? की वेगळीच समीकरणे तयार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Error: Contact form not found.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]