Scoregraph Media

एक्झिट पोल मधील बनवाबनवी उघड, एक्झिट पोल फर्जी असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया

स्कोअरग्राफ मिडीया

काल निवडणुकीचा अंतिम टप्पा संपताच सर्व एक्झिट पोल कंपन्यांनी व न्यूज चॅनल्सने एक्झिट पोल जाहीर केले व त्यामध्ये पुन्हा एकदा एनडीएला प्रचंड बहुमत मिळत असल्याचा कौल दिला. परंतु हे एक्झिट पोल खरे नसून बनवाबनवी असल्याचे उघड होत असून अनेक वाचकांनी ते लक्षात आणून दिले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इंडिया टुडे च्या महाराष्ट्रातील एक्झिट पोल बद्दल बोलायचे झाल्यास या एक्झिट पोल मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आठ ते दहा जागा निवडून येतील असे दाखवण्यात आले आहे आणि याच एक्झिट पोल मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नऊ ते अकरा जागा निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वस्तुस्थिती पाहायची झाल्यास महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना 15 जागा लढवत असून त्यापैकी 13 जागा या उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात आहेत. मग जर एकनाथ शिंदे यांच्या आठ ते दहा जागा आल्या तर उद्धव ठाकरे गटाच्या नऊ ते अकरा जागा कशा येतील हा प्रश्न हा एक्झिट पोल पाहून वाचकांना पडला आहे आणि यावरून स्पष्ट होत आहे की हे एक्झिट पोल हे फर्जी असून त्यामध्ये दिलेले आकडेवारी वस्तुनिष्ठ नाही किंवा त्यामध्ये दिलेले अंदाज देखील अभ्यासपूर्ण नाहीत.

बिहार मध्ये पासवान यांचा पक्ष(LJP) पाच जागांवर निवडणूक लढवत आहे. एक्झिट पोल मध्ये त्यांच्या पक्षाला चार ते सहा जागा दाखवण्यात आल्या आहेत.

 

हिमाचल प्रदेश मध्ये लोकसभेच्या एकूण चार जागा आहेत. त्यापैकी सहा ते आठ जागा एनडीए ला मिळतील असे एक्झिट पोल मध्ये दाखवण्यात आले आहे.

तसेच हरियाणा मध्ये लोकसभेच्या एकूण दहा जागा आहेत. पैकी सोळा ते एकोणीस जागा एनडीए ला व दोन ते चार जागा दाखवण्यात आल्या आहेत.

त्यामुळे एक्झिट पोल ही बनवाबनवी असल्याचे अनेक नेटकय्रांनी व्हिडिओ सहीत ट्वीट केले आहे.

 

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]