Scoregraph Media

पुण्यात धंगेकर जोरात… पोलिस अधिकाऱ्यांसमोर हप्ता वसुलीची यादीच वाचून दाखवली

स्कोअरग्राफ मिडीया

आज पुणे पोलिसांसमोर आमदार रवींद्र धंगेकर यांनी हप्ता वसुलीची यादीच वाचून दाखवल्याने पुणे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. पोर्शे कार अपघाताच्या घटनेपासून आमदार रवींद्र धंगेकर पुणे पोलिसांवर रोज एक आरोप करत आहेत. दोन दिवसापूर्वीच त्यांनी बारमध्ये जाऊन हप्ता वसुली करणाऱ्या व पार्टी करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल केला होता. आज तर रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर कोणता पोलीस कर्मचारी कोणत्या बारमधून किती हप्ता घेतो याची यादीच अधिकाय्रांसमोर वाचून दाखवली. यावेळी आमदार मोहन जोशीही उपस्थित होते.
आमदार धंगेकरांनी पुणे पोलिसांना एक दिवसाची मुदत दिली असून सर्व चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या बार वरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा…

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज