Scoregraph Media

इलेक्टोरल बाँड केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा – अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे पती परकला प्रभाकर यांचा दावा, बीजेपीला घरचा आहेर

स्कोअरग्राफ मिडीया

इलेक्टोरल बाँडच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने एसबीआय व सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर विरोधी पक्ष भाजपवर सतत टीका करीत आहे. त्यातच आता विरोधी पक्षाने अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे पती परकला प्रभाकर यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.काँग्रेसने दावा केला आहे की, परकला प्रभाकर यांनी इलेक्टोरल बाँड केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मत व्यक्त केले आहे. निर्मला सीतारामन यांच्याच पतीने सरकारला आरसा दाखवला असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने एका मीडिया चॅनेलला दिलेल्या निवेदनात इलेक्टोरल बाँडवर भाष्य केले असून ते म्हणाले, इलेक्टोरल बाँडचा मुद्दा भाजपला राजकीयदृष्ट्या महागात पडणार आहे.

केरळ वृत्तवाहिनी रिपोर्टर टीव्हीशी बोलताना परकला प्रभाकर म्हणाले की हा केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे हे आता सर्वांना समजू लागले आहे. या प्रकरणामुळे सरकारला देशातील मतदारांकडून कठोर शिक्षा होईल असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे बीजेपीसाठी हा घरचाच आहेर समजला जात आहे. आता देशातील मतदार इलेक्टोरल बॉण्डचा हा मुद्दा कितपत मनावर घेतील हे येत्या निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]