Scoregraph Media

कुस्ती महासंघ निलंबित; केंद्र सरकारने केली कारवाई, ब्रिजभूषणला धक्का?

स्कोअरग्राफ मिडीया

भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह आणि कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादा दरम्यान केंद्र सरकारने हे कारवाईचे पाऊल उचलले आहे.
कुस्ती महासंघाची निवडणूक अवैध असल्याचा दावा करत केंद्र सरकारने हे निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच नव्याने अध्यक्ष झालेले संजय सिंह यांच्या सर्व निर्णयांना ही स्थिती दिली आहे.

कुस्ती महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली होती, त्यामध्ये ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्ती असलेले संजय सिंह विजय झाले होते. त्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने ब्रिजभूषण सारखाच दुसरा कोणीतरी संघाचा अध्यक्ष झाला असल्याचा आरोप करीत कुस्तीलाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बजरंग पुनिया यानेही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानासमोर आपला पद्म पुरस्कार ठेवून या निवडीला विरोध दर्शवला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करत होते. खेळाडूंच्या वाढत्या दबावानंतर केंद्र सरकारने कुस्ती महासंघ निलंबित करण्याचा निर्णय घेतला असून नवीन अध्यक्ष संजय सिंह यांच्या निर्णयांना ही स्थगिती दिली आहे . तसेच पुढील आदेश होईपर्यंत कोणताही कार्यवाही करण्यासही स्थगिती दिली आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज