Scoregraph Media

वालचंदनगरच्या कामगारांनी केले अर्धनग्न आंदोलन

इंदापूर प्रतिनिधी
वालचंदनगर कंपनीतील आयएमडी कामगार समन्वय संघाच्या ६३० कामगारांनी २२ नोव्हेंबर पासुन संपास सुरु केला असून देशाच्या चांद्रयान, मंगळयान, सुर्ययानासारख्या मोहिमांमध्ये महत्वाची उपकरणे तयार करणाऱ्या वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील ६३० कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. २० दिवसापासून कंपनीचे कामगार संपावरती गेले असून कंपनीचे व्यवस्थापन दुजाभाव करीत असल्यामुळे कामगारांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे .

यासंदर्भात आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे म्हणाले की, वेतनवाढीच्या कराराची मुदत ३ वर्षांची असते पण कंपनी व्यवस्थापन वेळेमध्ये करार पूर्ण करीत नाहीत. दीड ते दोन वर्ष वेतनवाढीचा कराराची बोलणी सुरु ठेवून करार जाणीवपूर्वक रखडवला जात आहे. यापूर्वीचे करार देखील असेच रखडवून कामगारांना मेटाकुटीस आणले होते. तर याउलट व्यवस्थापनाचा वेतनवाढीचा करार मात्र विलंब न होता प्रत्येक वर्षी वेळेमध्ये होतो. जुलै २०२३ मध्ये व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा भरीव वेतनवाढ देण्यात आली. मात्र कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपून १६ महिने झाले आहेत. आत्तापर्यंत २१ बैठका झाल्या असून कामगारांच्या प्रश्‍नावर तोडगा निघत नसलेने कामगारांवर अन्याय होत आहे.

तसेच कामगारांची तीन पगार व इतर देणी थकीत असताना व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांचे एकाचदिवशी दोन पगार करुन कामगारांच्या जखमेवरती मीठ चोळल्याचा प्रकार घडला असून कामगारांनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांचा निषेध करुन अर्धनग्न आंदोलन केले आहे.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]