आम्हाला मान्य नाही – चंद्रशेखर बावनकुळे
स्कोअरग्राफ मिडीया
नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. महायुतीने महाराष्ट्रात 45 प्लस जागांची घोषणा केली होती, परंतु त्यांना फक्त 17 जागा मिळवता आल्या आणि यामध्ये भाजपला दोन अंकी संख्या हे गाठता आली नाही. राज्यातील या पराभवाची जबाबदारी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून आपल्याला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ हवा असून पक्षाचे काम करण्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस यांचा निर्णय मान्य नाही
देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय आम्हाला मान्य नसून सरकारमध्ये राहूनही संघटनेचे काम करता येते अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
महायुती फुटीच्या उंबरठ्यावर
एकूणच या सर्व परिस्थितीमुळे महायुतीत फूट पडणार की विधानसभेला देखील महायुती एकत्र राहणार अशा चर्चांना उधाण आले आहे. सकाळपासूनच अजित पवार गटातील दहा आमदार सुप्रिया सुळेंना संपर्क करत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुती विधानसभेला कायम राहणार की आताच ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ होणार अशा चर्चांना वेग आला आहे.